बातम्या आणि कंपनी अपडेट्स

सम्मान कॅपिटलला आघाडीच्या माध्यमांमध्ये मिळालेली प्रसिद्धी, त्यांचे विचार, यशाचे टप्पे आणि क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

वृत्तविश्वात

The Economic Times

दी इकॉनॉमिक टाइम्स

01 एप्रिल 2026

IHC च्या भक्कम पाठबळामुळे सम्मान कॅपिटल आता अधिक आक्रमकपणे घौडदौड करणार असल्याचे सीईओ गगन बंगा यांनी सांगितले

सम्मान कॅपिटलचे प्रमोटर बनण्यासाठी Abu Dhabi च्या IHC Group ने आपली संलग्न संस्था Avenir Investment RSC द्वारे सम्मान कॅपिटल (पूर्वीची Indiabulls Housing Finance) मधील 41.5% हिस्सेदारी संपादन करण्याचे काम पूर्ण केले असून हा व्यवहार जवळपास $1 अब्ज डॉलर्सचा आहे. एका मुलाखतीत सम्मान कॅपिटलचे सीईओ गगन बंगा यांनी Joel Rebello यांना सांगितले की मिळालेल्या नवीन भांडवलामुळे कंपनीला जवळपास आठ वर्षांच्या स्थिर काळानंतर \पुढच्या तीन वर्षांत आपली एकूण मालमत्ता थेट दुप्पट करता येईल. मुलाखतीचे संपादित भाग:

Moneycontrol

मनीकंट्रोल

01 एप्रिल 2026

सम्मान कॅपिटल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मूल्यनिर्मितीचा प्रवास असेल असे प्रतिपादन एमडी आणि सीईओ गगन बंगा यांनी केले आहे

पूर्वीची Indiabulls Housing Finance म्हणजेच आताच्या सम्मान कॅपिटलला नवीन प्रमोटर मिळाले आहेत — Abu Dhabi चे मुख्यालय असलेले International Holdings Company (IHC), ज्यांनी कंपनीत $1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. नवीन गुंतवणूकदार आणि नवीन ओळखीसोबतच एक नवीन दृष्टीकोनही आला आहे – केवळ गृहकर्ज देणारी संस्था म्हणून ओळखले जाण्याऐवजी आता विविध प्रकारची लोन देणारी संस्था बनणे हा यामागील उद्देश आहे. या नव्या वाटचालीचा पाया सुशासन आणि प्रगतीवर आधारित आहे, त्यामुळे बँक बनण्याची कंपनीची जुनी इच्छा आता मागे पडली आहे.

The Economic Times

दी इकॉनॉमिक टाइम्स

31 मार्च 2026

सम्मान कॅपिटलचा IHC Group मध्ये समावेश झाला असून हिस्सेदारी विक्रीच्या पहिल्या हप्त्यापोटी कंपनीला रुपये 5,652 कोटी प्राप्त झाले आहेत

सम्मान कॅपिटल ने मंगळवारी जाहीर केले की अबू धाबीमधील या कंपनीला इक्विटी शेअर्स आणि वॉरंट्सचे विशेष वाटप केल्याने आता ती IHC Group ची एक कंपनी बनली आहे. सम्मान कॅपिटलला हिस्सेदारी खरेदीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ₹5,652 कोटी प्राप्त झाले.

मीडिया आणि प्रेस

कॉर्पोरेट संवाद आणि मीडिया चौकशीसाठी.

location icon
टॉवर 1, 18th फ्लोअर, वन इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल मुंबई- 400013
कॉलबॅक मिळवा
उपलब्धता सोम-शनि | 9:00 AM - 6:00 PM